अंगेश बेहलपाडे शिक्षक परिषदेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त

0
20

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

भंडारा-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्हा कार्यकार्यकारणी च्या सभेत एक मताने भंडारा जिल्हा अध्यक्ष म्हणून अंगेशजी बेहलपांडे नियुक्ती करण्यात आली.
नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्हा कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा पदाधिकारी सातही तालुक्यातील प्रतिनिधी नागपूर विभाग अध्यक्ष उपस्थित होते. यापूर्वी *अंगेशजी बेहलपाडे* यांनी शिक्षक परिषदेत तालुका अध्यक्ष जिल्हा संघटन मंत्री व जिल्हा कार्यवाह म्हणून 27 वर्ष काम पाहिले आहे. गेल्या 27 वर्षां पासून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलने, धरणे आणि निवेदने यांच्या नेत्रूत्वात देण्यात आली आहेत. कामाचा अनुभव पाहता कार्यकारणी च्या सभेत एक मताने जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .