महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मारेगाव येथे फेसशिल्ड चे वाटप तसेच शहरात आजपासून निर्जंतुकीकरण सप्ताह सुरू

215

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मारेगाव शहारात छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांना मालार्पण करून साजरा करण्यात आला. कोरोना या महारोगामुळे मा. मुख्यमंत्री साहेबांनी सामाजिक कार्यक्रम करण्याचे आव्हाहन केले होते त्या अनुषंगाने मारेगाव शहरात नाभिक बंधू ना फेसशिल्ड चे वाटप करण्यात आले. शहरात आजपासून निर्जंतुकीकरण सप्ताह सुरू करण्यात आला आहे.

यावेळी संजयभाऊ आवारी तालुका प्रमुख शिवसेना, सुनीलभाऊ गेडाम तालुका संघटक, राजूभाऊ मोरे, जीवनभाऊ काळे उपतालुका प्रमुख,अभय भाऊ चौधरी शहर प्रमुख,सौ.डिमनताई टोंगे उपजिल्हा महिला संघटिका,सौ.रेखाताई मडावी नगराध्यक्षा, सौ.इंदुताई किन्हेकर माजी नगराध्यक्षा,सुनीता ताई मस्की, सौ.उमाताई देवगडे नगरसेविका, गणेश आसुटकर शहर प्रमुख युवासेना मारेगाव, श्रीकांत सांबजवर युवासेना तालुका संघटक, गोविंदा निखाडे, दिवाकर सातपुते,मत्ते, मस्की साहेब, राजू ठेंगणे, सुभाष बदकी नगरसेवक, डॉ.मनिष मस्की, डेव्हिड उज्वलकर, शहर व तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.