ओबीसी संघटना समनव्य समितीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

0
76

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची :: विविध मागण्यांसाठी सोमवारी २२ फेब्रुवारीला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा ओबीसी समाजाचा महामोर्चा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला तरी
देशभरातील ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गांचे कपात केलेले आरक्षण पूर्ववत करावे, या व अन्य मागण्यांसाठी कोरची तालूका ओबीसी संघटना समन्वय समितीच्या वतीने २२ फेब्रुवारीला तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी संघटना तालुका अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे सचिव अशोक गावतुरे, संघटन राष्ट्रपाल नखाते, उपाध्यक्ष भजनराव मोहूरले, डॉ नरेश देशमुख, मधूकर नखाते, प्रा संजय दोनाडकर, प्रा प्रदीप चाफले, प्रा मुरलीधर रुखमोडे, प्रा चक्रधर मांडवे, प्रा आर एस रोडके, अनिल वाढई ,हिराजी गुरनूले, आदी उपस्थित होते.