जल हेच जिवन मिशन योजनेचा शुभारंभ

0
22

 

धानोरा /भाविकदास करमनकर

धानोरा तालुक्यातील रांगी येथे जल जिवन मिशन अर्तगत,केद्रंशासन पुरस्कूत प्रत्येक घरी पाणी प्रत्येकाला पाणी १५ वित्त आयोगातुन पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ ग्राम पंचायत रांगी येथे करण्यात आला.मानवी जिवन जगत असताना पाणी हा घटक मानवाच्या मुलभुत गरजेत मोडतो पाणी हेच जिवन आहे ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे हे उद्दिष्ठ ठेऊन नवनिर्वाचित सरपंच फालेश्वरी ताई गेडाम व उपसरपंच नुरज हलामी यांचे हस्ते अजंनाबाई पेन्दांम यांचे घरी नळ कनेक्शन लावुन जल जिवन योजनेचा शुभारंभ करण्यात आले यावेळी ग्रा.पं. सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे,नरेंद्रजी भुरसे उपसरपंच,अरुण पासांडे,सुरेशजी हलामी,देवराव कुनघाडकर पत्रकार ,विस्तारी पेन्दांम,ठुमराज कुकडकार,राघोबा पासांडे,सौ.अजंना पेन्दांम,आकाश देशपांडे यांचेसह गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.