रामरावजी खंडारे बहुउद्देशिय समाज विकास संस्था, उपराई तर्फे नवनियुक्त सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा जाहीर सत्कार

0
78

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-दर्यापूर तालुक्यातील उपराई येथे दि.19फेब्रुवारी 2021रोजी” बु.रामरावजी खंडारे बहुउद्देशिय समाज विकास संस्था “उपराई, तर्फे संस्था कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच मा.रियाज खाँ वारिस खाँ पठान व उपसरपंच मा.अर्चनाताई सुरेंद्र खंडारे तसेच सदस्य श्री. संजय भाऊ दामोदर मेश्राम ,सदस्य जमील भाई (सचिव न्याय अधिकार सभा)श्रीमती. गौकर्णाबाई महादेव इंगळे वरील सर्व मान्यवरांचे पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. तसेच प्रतिमेचे पुजन संस्थाध्यक्ष व नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी केले .गावातील जेष्ट नागरीक से. नी.मुख्या. श्री. काशिनाथजी उभयकर गुरूजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.व गावाचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले. त्याचप्रमाणे श्री.अमोल भेंडे सर यांनी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाला अनुसरून जात ,धर्म,पंथ विसरून फक्त गावचा विकास करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.व संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांना सॅनिटायजर,व मास्कचे वाटप करण्यात आले.व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनेप्रमाणे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कोरोना बाबत सजगता व योग्य सूचना देण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण भेंडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच,उपसरपंच, सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक अतुल खंडारे,रहेमान भाई शहाॅ,श्री.प्रविण माहोरे ,पंकज खंडारे, आरिप भाई, कदिर भाई, मेहबूब खाँ, श्री. रामरावजी आठवले,विलास खंडारे,कलिमभाई ,किसनराव राऊत,अश्विन भेंडे, बाळकृष्ण खंडारे, सुरेशराव रा. खंडारे व बरेच प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संस्थाध्यक्ष यांनी केले.तर आभार प्रदर्शन संस्थासचिव भुषण खंडारे यांनी केले.