हर्ष साखरे प्रतिनिधी
नागभिड:-
तालुक्यातील मिडांळा येथे मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मृतक मुलीचे नाव स्विटी वसंता शेंडे वय १५ वर्ष असे नाव असून मिंडाळा येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्तांत या प्रमाणे आहे की,स्वीटी ही मुलगी दि:- २०/०२/२०२१ ला घरून बेपत्ता झाली होती. स्वीटीचा शोध घर शेजारी व घरच्या व्यक्तींनी शोध घेतला असता स्वीटीचा थांगपत्ता लागला नाही.परत शोध मोहीम दुसऱ्या दिवशी सुरू केला असता काल दिनांक २२/०२/२०२१ ला गावापासून २ कि.मी.अतंरावरील शेतातील विहिरीत स्वीटीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
लगेच सदर घटनेची तक्रार नागभिड पोलीस स्टेशनला देताच नागभिड पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेत स्विटीचा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून ताब्यात घेतला.
वृत्तलिहेपर्यत स्विटीच्या मृत्यूचे कारण कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास नागभीड पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.