देशी दारूसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त.. – दोघांना अटक,तिघे पसार,महत्त्वपूर्ण आरोपी मोकाट.. – वणी रोडवरील देशी दारु दुकानातुन तस्करीचा नेहमीच चालतो गोरखधंदा..

0
148

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

मारेगाव :
मारेगाव राज्य महामार्गावर अक्षरा बिअर बार मागे असलेल्या देशी दारु दुकानातील तीन अलिशान वाहनातुन देशी दारु चंद्रपुर येथे नेत असतांना पोलिसांनी छापा टाकुन दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची धक्कादायक घटना पुढे आली.

ही कारवाई आज दि.२३ मंगळवारला पहाटे साडेचार वाजताचे सुमारास करण्यात आली.दरम्यान यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असुन घटनास्थळावरुन तिघे पसार झाले.तर या प्रकरणातील खरे खलनायक पडद्याआड आहेत.या देशी दारु दुकानातून दारु दुकानातून तस्करीचा नेहमीचाच खेळ चालत असल्याची चवीने चर्चा शहरात रंगत आहे.

दारुबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात मद्यप्रेमीचे चोचले पुरविण्यासाठी व लॉकडाऊन चा पुरेपुर फ़ायदा घेत अत्यल्प वेळेत मोठ्या रकमेची वरकमाई करण्यासाठी मारेगाव वणी राज्य महामार्गावरील अक्षरा बिअर बारचे मागे असलेल्या जयस्वाल यांच्या देशी दारु दुकानातून ३ लाख ८८ हजार १२८ रुपयेची रॉकेट कंपनीची देशी दारु दोन स्विप्ट डिझायर क्रमांक एम.एच.०२ बी.जी.४६४३ , एम.एच.३१ ई .ए.४३३८ आणी डिस्ककव्हर क्रमांक एम.एच.२९ यु.७०९५ या अलिशान वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली.त्यानूसार घटनेचा वेध घेत उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने पाळत ठेवीत आज पहाटे साडे चार वाजताचे सुमारास छापा टाकला.यात देशी दारु व वाहनासह किमान १० लाख १८ हजार १२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त केला.या कारवाईत प्रमोद कृष्णाजी ठेंगणे व आतुर रामदास वर्हाटे यांना ताब्यात घेण्यात आहे.घटनास्थळावरुण तिघे पसार होण्यास यशस्वी झाले.मात्र दारु तस्करी करणारे खरे खलनायक पडद्याआड असल्याने त्यांचा पोलिस कसून शोध घेत आहे.परिणामी सदरील अनुज्ञप्ती धारक तस्करीसाठी नेहमीच खेळ चालवीत असल्याची चर्चा शहरात चवीने केल्या जात आहे.

परिणामी दारु तस्करी कारवाईत १५२ देशी दारु पेट्या हस्तगत करित ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुल्लजवार यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक जगदीश मंडलवार,पोलिस हवालदार आनंद अलचेवार,ना.पो.का.विजय वानखेडे,इकबाल शेख,प्रदीप ठाकरे,रवी इसनकर,परेश मानकर,नितीन खांदवे,बंटी मेश्राम यांनी केली.

मारेगाव शहरात दारु तस्करीची या नविन वर्षातील पहिली व मोठी कारवाई असल्याने मोठ्या तस्कर मासांनी धसका घेतला असला तरी कोरोना एन्ट्रीने नागरिकांच्या मानगूटीवर लॉकडाउन असतांना मारेगाव शहरात आंबेडकर चौकात भल्या पहाटे पासुन देशी दारु अवैद्यरित्या विकल्या जात आहे.याकडेही पोलिसांनी गांभीर्याने बघण्याची गरज बनली आहे.