अंजनगाव प्रशासनाने केला आपत्ती व्यवस्थापनाचा गुन्हा दाखल. शहरात कोरोनाचा कहर मात्र लोकांना समारंभाचा उल्हास..  लग्नाच्या समारंमभा मुळे झाला २५ हजार रुपये दंड..

0
1891

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)अमरावती जिल्ह्यातील
अंजनगाव शहरातील अकोट रस्त्यावर असणाऱ्या केजीएन काट्या जवळ असणाऱ्या गोविंद नगर मध्ये जाहीर खां. युनूस खां. यांचे परिवारात लग्नाचे धुमधडाक्यात रिसेप्शन सुरु होते. ज्याची सूचना अंजनगाव स्थानिक प्रशासनास मिळताच तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार राजेश राठोड व त्यांचे कर्मचारी यांनी त्या समारंभाच्या आयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या वरुण गुन्हा दाखल केला असून २५ हजार रुपये दंड थोटवला आहे. अंजनगाव शहरात दी. २२ फेब्रुवारी रोजी ५३ कोरोना बाधित रुग्ण आढळले असताना संपूर्ण शहर व तालुका कोरोना महामारीच्या विळख्यात आहे. त्यात अंजनगाव येथील एका प्रतिष्टीत व्यापाऱ्यांची सुपर हॉस्पिटल अमरावती येथे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मुळे मृत्यू झाला असे असताना शहरात गर्दी करण्यासाठी मनाई आदेश निर्गमित झाले आहेत ज्यानुसार राजकीय सामाजिक सभा, मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ आठवडी बाजार व गर्दीच्या ठिकाणावरील व्यापारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत असे असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, सारख्या शहरातून पाहुण्यांना बोलावून सुरु असणारे हे रिसेप्शन कोणत्या कायद्याचे पालन करीत आहे. ज्यावरून वैशाख वाहुरवाघ यांचे मार्गदर्शनात ठाणेदार राठोड, दुय्यम ठाणेदार विशाल पोळकर, शेवतकर, कांदे, हे त्या समारंभात गेले असता नवरदेवाच्या जवळ दोन तीन लोक बसलेले दिसले. तसेच शंभर लोक टेबल खुर्चीवर जेवण करीत होते. ज्यावरून मा. जिल्हाधिकारी यांनी दीलेल्या आदेशाचा भंग केल्यावर कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत अप. क्र. १३३ दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत झालेल्या गुन्ह्यात नगर पालिका अंजनगावच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आरोपीचे नातेवाईक अयुब खान युसूफ खान यांचे जवळून पावती क्र. ४४५९ नुसार वरात पंगत कार्येक्रमात्त ५० पेक्षा जास्त लोक असल्यामुळे दी. २३ फेब्रुवारी रोजी २५००० हजार रुपये एच.डी.एफ.सी. बँकेचा धनादेश क्र. ०१४५ नुसार वसुल केले आहेत.