वणीत दुषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात,नगर सेविका आरती वांढरे यांचे मुख्यधिकाऱ्यांना निवेदन

0
85

 

वणी : परशुराम पोटे

शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये तिन दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत नगर परिषदेला सुचना देऊन सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे दि.२२ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे लक्ष देण्याची मागणी नगर सेविका तसेच भाजपाच्या महिला शहराध्यक्षा आरती वांढरे यांनी केली आहे.