प्रतिनिधी/शुभम पारखी
ग्राम पंचायत बोरगांव( बुट्टी) यांचेकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत श्री. राजेराम टेंभुरकर यांचे शेतातील बोडी खोलीकरनाचे काम सुरू केले आहे गावांतील मजुरांना रोजगार प्राप्त होऊन विकास व्हावा यासाठी ग्राम पंचायत चे सरपंच श्री. रामदास चौधरी हे नेहमी प्रयत्नात असतात त्यांचे विकास कामे लक्षात घेता यावर्षी सुद्धा जनतेनी त्यांना दुसऱ्यांदा निवडून दिलें आहे.
या कामाचे भूमिपूजन पंचायत समिती चिमूर चे माजीसभापती तथा सदस्या विद्या रामदास चौधरी यांचे शुभहस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित मजुरांना रामदास भाऊ चौधरी यांनी मौलिक मार्गर्शन केले. या वेळी प.स.चिमूर माजीसभापती विद्या चौधरी,सरपंच श्री. रामदासजी चौधरी, सदस्य श्री सुनिल तांदुळकर, श्री. भारत वाघ सदस्य, सौ. सपना टेंभुरकर उपसरपंच, रोजगार सेवक, श्री. उमेश टेंभुरकर ,श्री. मधुकर सावसाकडे, प्रणित जांभुळे, कवडु आत्राम, शंकर चौधरी , बंडु जांभुळे, माजी उपसरपंच श्री. अजय जांभुळे, सुमित गायकवाड,सौ. वनिता भरडे,सौ. वनिता गायकवाड ,सौ. सोनी शंकर चौधरी , सौ. सविता चौधरी,तथा मजूर उपस्थित होते.