शिव छत्रपती स्पोर्ट्स लामज आयोजित शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धा संपन्न

0
111

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

भिवंडी : शिव छत्रपती स्पोर्टस लामज मंडळांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने भव्य छत्रपती महाराज चषक क्रिकेट सामान्यांचे १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी रोजी आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये ३४ संघानी सहभाग दर्शवला होता.विजेता संघ आई गावदेवी अनगांव संघ, रोख रू. 25000 व भव्य चषक,उपविजेता JDC आकल्पे संघ, रोख रू 12500 व भव्य चषक, तृतीय क्रमांक : स्टार XI म्हापोली संघ – रोख रू 7000 व भव्य चषक,या स्पर्धेमध्ये मालिकाविर : अक्षय कासार (आई गावदेवी अनगांव ), उत्कृष्ट फलंदाज : अक्षय कासार (आई गावदेवी अनगांव ),उत्कृष्ट गोलंदाज : कल्पेश साळुंखे (आकल्पे )सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कु.अक्षय चव्हाण, भावेश चव्हाण, सुशांत चव्हाण, नागेश निकम, योगेश चव्हाण, नितेश जाधव, प्रवीण मोरे, सौरव चव्हाण, मनीष निकम, रोहित चव्हाण तसेच शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघाचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.बक्षीस वितरण कार्यक्रमचे सूत्र संचालन श्री अमोल चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी समाजातील कोयना समाजातील मान्यवर श्री. बळीराम शिंदे(अखिल कार्यकारिणी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), श्री. अजय जाधव(अध्यक्ष कोयना प्रतिष्ठान ठाणे-पालघर) श्री सतीश चव्हाण (मा. उपाध्यक्ष – को. पू. म. स. से. संघ रायगड ठाणे-पालघर), श्री. नितीन जोशी (शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी), श्री. राजेंद्र निवळे(सचिव-कोयना प्रतिष्ठान ठाणे -पालघर), श्री. दिपक सिंदकर (को. पू. म. स. से. संघ रायगड ठाणे-पालघर), श्री दिनेश चव्हाण (उप सरपंच ग्रा. पं. लामज),श्री. रमेश निवळे(अध्यक्ष – ठाणे जिल्हा अखिल),श्री. शशिकांत शिंदे (कार्याध्यक्ष कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघर) श्री. सुदर्शन जाधव (कविवर्य- पत्रकार -जल फाउंडेशन कार्यकर्ते),श्री.नकुल भोसले(सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघर),श्री. प्रमोद निवळे (सहसचिव ठाणे पालघर विभाग), तसेच इतर सन्माननीय समाज बंधू व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*