नगरसेवक किरण लांडगे यांच्या माध्यमातून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेल्या इबुक चे लोकार्पण

292

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 160 चे नगरसेवक किरण लांडगे यांच्या माध्यमातून ईबुक चे लोकार्पण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन केले असताना शैक्षणिक संस्था बंद होतें या सर्व शाळा कॉलेज बंद असल्याने सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेल्या इबुक चे लोकार्पण नगरसेवक किरण लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान संत गाडगे महाराज धर्मशाळा येथे कर्क रुग्णांना फळ वाटप देखील करण्यात आले.