पाऊलवाट फाउंडेशन, पारशिवनी

0
26

 

छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना बस स्टॉप पारशिवनी येथे मानवता एकता मंच, पाऊलवाट फाउंडेशन, आकाशझेप फाउंडेशन, शिवजन्मशोव समिती, जीवोदय फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रक्तदान करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला तहसीलदार वरुणकुमार सहारे, खंडाविकास अधिकारी खाडे, ठाणेदार वैरागडे, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगर पंचायत अध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, डॉ. इरफान अहमद यांच्या हस्ते माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. लगेच खळतकर सभागृह पारशिवनी येथे सूपर हॉस्पिटलद्वारे रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुष व महिला असे ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी आमदार आशिष जयस्वाल, पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे, शरद डोणेकर,रामटेक पंचायत सार्मिती चे खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रह्मनोटे एन जी ओ निता ईटनकर ,पत्रकार, प्रा’तिष्ठित नागरिका यांनी शिबिरस्थळी भेटी दिल्या. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेऊन सर्वांनी मास्क परिधान करून महाराजा ची जयंती साजरी करण्यात आली. आयोजकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी एकत्र लढा देण्याचे आवाहन केले.चा वेळी आयोजना करिता मानवता एकता मंच, पाऊलवाट फाउंडेशन, आकाशझेप फाउंडेशन, शिवजन्मशोव समिती, जीवोदय फाउंडेशन चे कार्यकते मोठी संख्येत उपस्थित राहुन यांनी पुढाकार घेतला.