0
48

 

पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र):-तालुक्यातील भगिमाहारी शिवारातील पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीत रविवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी २ वाजतादरम्यान श्रीराम नेवारे यांच्या गावाजवळील गोठय़ात बांधून असलेल्या गायीची बिबट्याने शिकार केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
श्रीराम नेवारे यांच्यासह अनेक शेतकरी जागेअभावी गावाच्या बाजूला गोठे निर्माण करून गुरे जनावरे बांधतात. तेव्हा सकाळी दोन वाजतादरम्यान संधी साधून बिबट्याने श्रीराम यांच्या मालकीच्या गायीवर हल्ला करून गायीला ठार केले.
नेवारे जेव्हा गुरे गोठय़ातून बाहेर काढण्यासाठी गेले. तेव्हा गाय जखमी होऊन मरून पडली असल्याचे दिसले. तेव्हा सदरची माहिती पारशिवनी वनपरिक्षेत्र कार्यालयात देण्यात आली. त्यावरून वन कर्मचारी रमेश बोंदरे, पिल्लारे व खोरगडे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून अहवाल कार्यालयात सादर केला. शिकार झालेल्या गायीची किंमत १२ हजार रुपये नोंदविण्यात आली. नुकसानभरपाई मिळावी, अशी पीडित श्रीराम नेवारे यांच्यासह गावकर्‍यांची मागणी आहे. घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, वन अधिकार्‍यांनी जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी भागीमहारी ग्राम पंचायत चे सरपंच ज्ञानेश्वर राऊत, ब गावकरी नागरिकांनी केली आहे.