गोंडी मातृभाषेत शाळा सुरू.!

0
137

 

ऋषी सहारे
संपादक

दिनांक २१/०२/२०२१ रोजी मौजा मोहगांव येथे जागतिक मातृभाषा दिनानिमित्य ग्रामपंचायत मोहगांव अंतर्गत आपल्या गोंडी मातृभाषेत शाळा सुरु करण्यासाठी आज पर्यन्त जे प्रयत्न सुरु होते. त्याचे आज जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधुन त्याचे उदघाटन करण्यात आले. पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल मोहगांव या नावाने शाळा सुरु करण्यात आली.
या प्रसंगी उदघाटक म्हणून लालू आतला भूम्या यांचे हस्ते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली
प्रमुख पाहुणे म्हणून गणेशदादा हलामी , यशोधरा नामदेवराव उसेंडी मुख्याध्यापिका, हेमंत डोर्लीकर पत्रकार, प्रल्हाद मश्याखेत्री पत्रकार, जयंत निमगड़े पत्रकार, दिनेश पानसे कृषि सहहायक, जयंत मेश्राम ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी हा क्षण ऐतिहासिक असून आपण त्याचे साक्षीदार राहणार आहोत असा उल्लेख व मार्गदर्शन केले.