रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केलेले चिरेबंदी बांधकामाला गेले तडे. हिरवळ ही सुकली. जिल्हा प्रशासन ठेकेदारावर कारवाई करणार काय? नागरीकांचा सवाल

202

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुशोभिकरणासाठी तयार करण्यात आलेल्या चिरेबंदी बांधकामाला वर्ष व्हायच्या आतच तडे गेले आहेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे, लावण्यात आलेली हिरवळ ही वर्षभराच्या आतच सुकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय रत्नागिरी नगर परिषद जयस्तंभ ते मिरकरवाडा या दरम्यान रस्त्यावरील डीव्हायडर देखील सतत ढासळत आहेत. त्यामुळे सदर दोन्ही कामांचे ठेके घेणा-या ठेकेदारावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल नागरीकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. ही कामे करुन अजुन एक वर्ष देखील झालेले नाही. आणि एवढ्यातच या बांधकामांना तडे देखील गेले. यावरुन हे काम निकृष्ट दर्जाचेच केले गेले होते का? तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांनी बांधकामाची व हिरवळ विकसित करण्यासंबंधी कामे झाली होती या झाडांमुळे व हिरवळीमुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची शोभा अधिक वाढली होती मात्र अल्पावधीतच हिरवळ सुकल्याने व चिरेबंदी बांधकामाला तडे गेल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर जिल्हा प्रशासनाने तरी संबांधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी या कामांची चौकशी करावी अशी मागणी रत्नागिरी शहरातील नागरीकांमधून करण्यात येत आहे.

दखल न्यूज भारत