या जिल्हात आहे सात दिवसांसाठी ‘लॉकडाउन

0
591

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे.
“अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी.

तसेच नागरिकांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश आज घेतलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.” अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली.