खल्लार पोलिसांनी 16 लाख रुपये किमतीचे गोवंश पकडले, 57 जनावरे जिवंत 8 मृत खल्लार पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

0
349

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-मध्य प्रदेशातील इंदोर येथून अकोला येथे गोवंश तस्करीच्या माध्यमातून नेण्यात येणारा गोवंशनी खच्चून भरलेला कंटेनर काल शनिवारी रात्री 8 ते 8:30 वाजताच्या दरम्यान खल्लार पोलिसांनी नालवाडा नजिक पकडला असुन खल्लार पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत
काल 20 फेब्रुवारीला खल्लार पोलिस पेट्रोलिंग करीत असताना नालवाडा येथे त्यांना कंटेनर यु पी 21,बि एन 8386हा दर्यापूरकडे जात असताना दिसला त्या कंटेनरवर संशय आल्याने तो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात 65 गोवंश आढळून आले कंटेनर मधिल दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत तर एक आरोपी इमरान खा सलीम खा वय 26 वर्ष रा गांधी नगर इंदोर यास ताब्यात घेऊन पो स्टे ला जमा केले
कंटेनरमध्ये एकूण 65 जनावरे कोंबून ती दर्यापूरमार्गे अकोल्याकडे जात होते याची किंमत 16लाख 25हजार आहे सर्व जनावरांना गाडगेबाबा गोरक्षण मध्ये दाखल केले हि माहिती गाडगेबाबा गोरक्षणचे संचालक प्रा गजानन भारसाकळे यांना मिळताच त्यांनी गोरक्षण मध्ये धाव घेतली कंटेनरमधिल सर्व जनावरांना खल्लार पो स्टे चे ठाणेदार विनायक लंबे यांच्यासह पो हे कॉ राजु विधळे, पो हे कॉ अशोक सावरकर,पो हे कॉ ज्ञानेश्वर सिडाम, रामेश्वर नागरे, संतोष राठोड, संजय गायकवाड, मंगेश बचे, सैनिक माहोरे, सैनिक श्रीकांत तायडे यांनी स्वतः बाहेर काढण्यास मदत करुन ती सर्व जनावरे गोरक्षण मध्ये दाखल केले या कामात खल्लार पोलिसांना रात्र झाली रात्रभर खल्लार पोलिसांनी प्रशंसनीय काम केले
जिवंत जनावरांवर दर्यापूर येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप देशमुख, डॉ पि एस अस्वार, डॉ अतुल कल्हाने, डॉ आर एस राठोड, डॉ अनिल गवई यांनी उपचार केलेत तर मृत पावलेल्या 8 जनावरांचे शवविच्छेदन केले
गोवंशची डाक सर्व्हिसच्या माध्यमातून तस्करी
कुणालाही संशय येऊ नये म्हणून गोवंशची तस्करी हि डाक सर्व्हिस लिहिलेल्या कंटेनरमधून केल्या जात होती गोपनीय माहितीनुसार गोवंश तस्करी होत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार डाक सर्व्हिस कंटेनरवर पोलिस संशय घेणार नाहीत म्हणून तस्करानी डाक सर्व्हिस कंटेनरमधून गोवंशची छुप्या पध्दतीने वाहतूक केली याआधी गोवंश तस्करी केल्या जात होती मध्यंतरी ती बंद होती यापुढे गोवंश करणाऱ्या तस्करावर कडक कारवाई करण्यात येईल
विनायक लंबे, ठाणेदार, खल्लार