Home रायगड रायगड चौल च्या रामेश्वर मंदिरात सप्ताह सोहळ्यास प्रारंभ मात्र देऊळ बंद

रायगड चौल च्या रामेश्वर मंदिरात सप्ताह सोहळ्यास प्रारंभ मात्र देऊळ बंद

334

 

(प्रतिनिधी / मिथुन वैद्य )

रायगड :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारळ सुपारीच्या बागायतीन मध्ये  वसलेले , देवदूताचे गाव म्हणुन चौल गावाची ओळख आहे. चौल गावाला जवळपास ३५०हून अधिक देवी देवताची मंदिरे आहेत.त्यातील चौल रामेश्वर मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे भाविकांनचे श्रद्धा स्थान आहे. श्रावण महिन्यातील येणाऱ्या पहील्या सोमवार ते पुढील सोमवार अशा दिवसात
चौल रामेश्वर मंदिरात सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले जाते
परंतू यंदा मात्र कोरोना ने चौल च्या रामेश्वर मंदिरातीच्या सप्ताह सोहळ्यास ही सावट असून अत्यंत साध्या पध्दतीने येथील मंदिरात परंपरा खंडित न होता पाच पाच जण एकत्र येऊन ते सुद्धा अंतर ठेऊन प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत सप्ताह सोहळा साजरा होत आहे . श्रावण महिन्यात येथील मंदिरात भाविकानची दर्शना करता मोठी गर्दी होते. परिणामी मंदिर मात्र बंद ठेवण्यात आले आहे.
असे असलेले तरी भाविकानचा  उत्साह कायम असून साध्या पद्धतीने का होईना सप्ताह सोहळयास प्रारंभ झाला आहे.

दखल न्यूज भारत

Previous articleरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ते शौचालय बंद अवस्थेत.
Next articleमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणच्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने सॅनिटाईझर वाटप