गुहागरच्या सुपुत्राला नवचैतन्य महाराष्ट्र कवीरत्न पुरस्कार प्राप्त

0
42

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

गुहागर : तालुक्यातील शीर गावचे सुपुत्र नवोदित कवी शैलेश भागोजी निवाते लिखीत ‘जीवनशैली’ हा काव्यसंग्रह सन २०१९ मध्ये मुंबई येथील दादर येथे प्रकाशित करण्यात आला होता. या काव्यसंग्रहात आयुष्य, भूक, रक्षण दाता, महाराष्ट्र माझा, बाप, उंबरठा अशा अनेक विषयांना धरुन त्यांनी कवितांचे सकस लेखन केलेले आहे. या कवीने लिखाण प्रवासात रमता रमता आजवर या काव्यसंग्रहातून त्यांना दोन पुरस्कार प्राप्त देखील झाले आहे.
यामध्ये नवचैतन्य सामाजिक विकास संस्था, डोंबिवली (रजि.) यांच्याकडे ‘नवचैतन्य महाराष्ट्र कवीरत्न पुरस्कार -२०२०’ साठी या कवीने पाठवलेला परिचय व ‘जीवनशैली’ हा काव्यसंग्रह सर्वात्कृष्ठ ठरला. या नवोदित कवीला ‘महाराष्ट्र कवीरत्न पुरस्कार विजेता २०२०’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. या आधीही त्यांना सन २०१९ मध्ये मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर या संस्थेच्या वतीने ‘राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार सन्मान विजयी २०१९’ हा सुद्धा पुरस्कार या नवोदित कवीला प्राप्त झाला आहे. या यशदायी लेखन प्रवासातून कवीने स्वतः सह तालुक्याचे व आपल्या गावाचे नावलौकिक केले आहे. या कवीने आपल्या २५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर पुस्तक प्रकाशित करून सर्व काव्यरसिकांसाठी ही एक अमूल्य भेट दिली होती. या ‘जीवनशैली’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा त्यांनी केलेला निश्चय पूर्णत्वास केल्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या यशामागे त्यांच्या आई – वडिलांचे आशिर्वाद लाभल्याने आजवरचे यश त्यांना प्राप्त झाले आहे. यामागे या नवोदित कवीला मिळणारे साहित्य प्रेमी यांचा भरघोस प्रतिसाद निश्चितच मनोबल उंचावणारे आहेत असे ते आवर्जून सांगतात.

दखल न्यूज भारत