संदीप येवले यांना पै. खाशाबा जाधव पूरस्कार प्रदान

0
159

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि. २१ : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन सभागृहात (टाऊन हॉल), ऑलिंपिकवीर “पै. खाशाबा जाधव जीवन गौरव पूरस्कार” वितरण समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या व्यक्तींना हा पूरस्कार देण्यात येतो. खेळाचा प्रचार, प्रसार व खरोखर मेहनत घेतलेल्या व्यक्तींना सर्वोत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणुन हा पूरस्कार द्यावा हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह (आण्णा), विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, सचिन पाटील, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीष कदम व विनोद कदम हे उपस्थित होते.

तायक्वाँडो या खेळात संदीप येवले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन या वर्षीचा पै. खाशाबा जाधव “खेलरत्न पूरस्कार” त्यांना प्रदान करण्यात आला. ते मुंबई महापालिका शाळांत तायक्वाँडोचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. आजतागायत त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. अनेक शालेय स्पर्धा, असोसिएशन स्पर्धा, विद्यापीठ स्पर्धा, मुंबई महापौर चषक स्पर्धांचे आयोजन नेहमीच करत असतात. गेली अनेक वर्षे मुंबई उपनगर जिल्हा तायक्वाँडो असोसिएशनचे ते सचिव आहेत. महाराष्ट्र शासनचा मुंबई उपनगर जिल्ह्याचा “गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पूरस्कार” त्यांनी यापूर्वीच पटकावला आहे.

मुंबई महापालिका वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी, मुलुंड ‘टी’ विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, हितचिंतक यशवंत चव्हाण, प्रमोद वेटे व दिलीप अहिनवे यांनी संदीप सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.