रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ते शौचालय बंद अवस्थेत.

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी शहर परिसरात आहे. रत्नागिरी जिल्ह्याभरातील लोक विविध कामांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येत असतात. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय नेहमीच गजबजलेले असते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शौचालयाची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारे जुने शौचालय यापैकी एक कायमस्वरूपी बंद अवस्थेत आहे. तर दुसरे या ठिकाणी जाण्यास मार्गही नाही, या ठिकाणी मोठ्या उंचीचे गवत वाढले आहे तर शौचालय वापरण्या सारखे नाही, अस्वच्छ अवस्थेत आहे. या दोन शौचालया शेजारी नवीन शौचालय बांधण्यात आले आहे मात्र ते देखील बंद अवस्थेत असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. व लोक उघड्यावर शौचालयास बसत असल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेत शौचालय वापरासाठी खुले करावे अशी मागणी तेथे येणारे शेकडो नागरिक करीत आहेत.

दखल न्यूज भारत