दोन मोटारसायकली परस्परांना धडकल्याने सिरोंचा तालुक्यातील तीन युवकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी तेलंगणा हद्दीत अपघात

0
185

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली/अहेरी:-सिरोंचा वरून तेलंगणा कडे जाणाऱ्या MH33R 4965 क्रमांकाच्या मोटारसायकल ला परस्पर येणारी मोटारसायकल धडक दिल्याने सिरोंचा तालुक्यातील तीन युवक जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी युवकाला तेलंगणा राज्यातील मंचिरियाल दवाखान्यात उपचारासाठी रेफर केले आहे.
मृतांमध्ये प्रसाद परसा 26 सिरोंचा, रेवंत मुदुमडगेला 21सिरोंचा, सुमन सल्ला 22 रंगधामपेठा असे मृतकाचे नाव आहेत तर रवी सल्ला 25 पोचमपल्ली, नितीन जक्का 24 सिरोंचा यांनी गंभीर जखमी आहेत.
सदर घटना इतकी भीषण आहे की दोन्ही मोटारसायकली चकनाचूर झालेले आहेत.ही भीषण अपघात सिरोंचा जवळील प्राणहिता नदी पुल्या जवळ एक किमी अंतरावर तेलंगणा राज्यात राष्ट्रीय महामार्ग 63 वर घडला आहे.जखमी अवस्थेत असलेले नितीन जक्का हे सिरोंचा तहसील कर्मचारी म्हणून तहसीलदार यांचे वाहनचालक पदावर कार्यरत आहेत.