आदिवासी विद्यार्थी संघटने कडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत

117

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : सिरोंचा तालुक्यातील अमरावती येथील मृतक गंगुलू येदासुला यांच्या कुटुंबाला आदिवासी विद्यार्थी संघटने कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
मृतक गंगुलु यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आली असून कुटुंबातील कमावता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात पडले. ही बाब आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगम याना कळताच वेळेचा विलंब न करता अमरावती येथील मृतक गंगुलु यांचे घरी भेट देऊन त्यांचे कुटुंबाचा सांत्वन करून आदिवासी विद्यार्थी संघटने कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यात कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी राहून अनेक गरजू लोकांना अनेक मदत करण्यात आविसचे बानय्या जनगम पुढे राहतात.यावेळी अमरावती येथील आविसचे लक्ष्मण बोले,मलय्या येदासुला,किष्टस्वामी येदासुला,लक्ष्मीस्वामी बीरेल्ली,किष्ठस्वामी बोलेसह गावकरी उपस्थित होते..