झेप प्रतिष्ठान “मराठा गौरव २०२१” पुरस्काराने सन्मानित

0
88

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

ठाणे : झेप प्रतिष्ठान ही संस्था ठाण्यातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था असून गेल्या १० वर्षापासून या संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात..जवळपास ६० पेक्षा जास्त उपक्रमांच्या माध्यमातून झेप प्रतिष्ठान परिवार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. शिक्षणातून समृध्दी या ब्रीद वाक्यानुसार शैक्षणिक क्षेत्रातून समाजाची प्रगती साधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्या अंतर्गत जव्हारच्या आदिवासी पाड्यातील जवळपास १००० शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, कॉम्प्युटर प्रयोगशाळा तसेच या पाड्यातील लोकांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन करत असते.
कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये जवळपास ८०० लोकांना झेप प्रतिष्ठानने अन्न धान्य पुरवले. तसेच कोल्हापूर सांगली पुरादरम्यान ही लोकांना जीवनावश्यक साहित्य पुरवले होते. अश्या अनेक उपक्रमांची दखल मराठी क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ठाणे तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव ठाणे तर्फे झेप प्रतिष्ठानच्या सामाजिक योगदानाबद्दल दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ शिवजयंती दिनानिमित्त “मराठा गौरव पुरस्कार २०२१” ठाण्याचे आमदार श्री संजय केळकर, आमदार श्री निरंजन डावखरे, यांच्या हस्ते देण्यात आला..या प्रसंगी नगरसेविका सौ आंब्रे मॅडम, मराठा क्रांती मोर्चाचे श्री रमेश आंब्रे, श्री मनोहर सुखदरे, श्री विजय वर्मा हे उपस्थित होते… हा पुरस्कार झेप प्रतिष्ठानच्या सर्व मित्र परिवार आणि प्रत्येक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे मिळाला आहे असे झेप प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री विकास धनवडे यांनी सांगितले.

*दखल न्यूज भारत*