पोलीस भरतीच्या प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

118

 

मंगरूळपीर (दि.27): राज्य शासनाने नुकतीच पोलीस भरती जाहीर केली असून राज्यभरातील अनेक युवक पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. परंतु ही भरती कोणत्या पद्धतीने होईल? अगोदर शारीरिक चाचणी की लेखी अथवा किती गुणांची? अशा अनेक प्रश्नांचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये पडलेला आहे. तरी शासनाने या भरतीच्या प्रक्रियेचे स्वरूप तात्काळ जाहीर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश चिपडे, शहराध्यक्ष सचिन मांढरे, तालुका उपाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका सचिव निलेश निचळ, लक्ष्मण व्यवहारे, गणेश वानखडे, मयूर खडसे, ओम इंगळे, अनिरुद्ध पार्डीकर, प्रतीक इंगोले, दीपक भगत, धीरजसिंग ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फुलचंद भगत,वाशिम
मो.8459273206