स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व जनजागृती स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले संपन्न

58

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

मारेगाव:- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत नगरपंचायत मारेगाव च्या वतीने दि.१९/०१/२०२१ रोजी रांगोळी, चित्रकला आणी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या क्रमांक पटकविनाऱ्या ना मारेगाव नगरपंचायत सभागृहात दि.१८/०२/२०२१ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस सोहळा आयोजित करण्यात येवून निबंध स्पर्धक मधून पहिला क्रमांक पटकवनारि विजेता कांचना आवारी दुसरा क्रमांक शिवानी शेंबलकर व तिसरा क्रमांक संकल्प कोळगीरवार यांचा आला त्यांना मारेगाव नगरपंचायत चे मुख्य अधिकारी श्री. अरुण मोकल साहेब यांच्या बक्षीस देण्यात आले.चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक साक्षी बोरेकर दुसरा क्रमांक रेवा ठमके तिसरा क्रमांक सोनू तेलंगे यांचा आला त्यांना निखिल चव्हाण नोडल अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक सोनु तेलंगे दुसरा क्रमांक फिरोज शेख तिसरा क्रमांक चैताली ढेंगले यांचा आला. त्यांना आस्वले सर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश एकच आहेत की. स्वच्छ भारत मिशनची जनजागृती करून घरोघरी संदेश पोहचवून घरातील, गावातील व परिसरातील स्वच्छता करीत रहावी व शासनाला मदत करावी. या कार्यक्रमाला नगरपंचायत मारेगाव चे मा. मुख्य अधिकारी अरुण मोकल साहेब, निखिल चव्हाण (नोडल आफीसर) गणेश निखाडे (स्वच्छता निरीक्षक) व सोनाली बी. पूसनाके (शहर समन्वयक) उपस्तीत होते.