राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य अहेरी येथे विविध कार्यक्रम संपन्न. आलापल्लीत वृक्ष रोपन कार्यक्रमासह उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप ! शिव सैनिकांनी व्यक्त केल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

141

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

सोमवार 27 जुलै रोजी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांचे वाढदिवस अहेरी व आलापल्ली शहरात शिव सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेनेचे अहेरी उपजिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या नेतृत्वात अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले.
सर्व प्रथम रुग्णालयातील डॉ.संजय उमाटे, शिव सेनेचे रियाज शेख व अरुण धुर्वे यांच्या शुभहस्ते रुग्णांना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले. त्यांनतर शिव सैनिकांनी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना फळे व बिस्कीट वाटप केले. विशेष म्हणजे आलापल्लीत वृक्ष रोपनाच्या कार्यक्रमाद्वारे वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी शिव सेनाचे अहेरी उपजिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे हे राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन कार्य करीत आहेत. कोरोना या महामारीच्या संकटातही गोर गरीब जनतेची व महाराष्ट्र राज्याची उत्कृष्ट व उत्तम सेवा बजावून संकटाच्या या महाभिषण काळात उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने राज्यासाठी मिळालेलं मोठ बळ आहे तसेच ही अत्यंत गौरवाची बाब असून महाराष्ट्र राज्याला एक नवी उभारी मिळण्यासाठी व विकासाच्या उत्तुंग भरारीसाठी शिव सेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो असे म्हणत रियाज शेख यांनी वाढदिवसाचे यावेळी शुभेच्छासह व शुभसंदेश दिले.
सदर कार्यक्रमाला फळे व बिस्कीट वितरित करताना रुग्णालयात यावेळी शिवसेनेचे अहेरी तालुका प्रमुख अक्षय करपे, सुभाष घुटे, बिरजू गेडाम, दिलीप सुरपाम, विलास पोचमपल्लीवर, दीपक तागेरवार, नागेश राजनलवार, रोहित सडमेक, प्रभाकर शेंडे, गौरव दोंतुलवार, सोनू नार्लावार, सतीश आत्राम, गणेश गुरुनूले आदी शिवसैनिक उपस्थित होते.