शिवजयंती निमित्त श्री माऊली सेवाभावी सामाजिक संस्था विटावा (ठाणे) संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
165

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

ठाणे : श्री माऊली सेवाभावी सामाजिक संस्था विटावा ठाणे ही सामाजिक संस्था अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असते. ही संस्था रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, गड किल्ले मोहीम व गड संवर्धन, गड स्वच्छता अभियान, अनाथ गरजूंना मदत असे अनेक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आले आहेत.तसेच दरवर्षी आदिवासी भागात कपडे, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दिवाळी फराळ वाटप ही संस्था करत असते.कसारा आदिवासी भागात एक बोअरवेलचे काम सुध्दा करून दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अध्यक्ष श्री. सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कसारा कसारा गावंड पाडा आणि बालग्राम आश्रम पनवेल या दोन ठिकाणी अन्नधान्य वाटप केले. तसेच संस्थेमधील १० सभासदांनी रक्तदानही केले.

*दखल न्यूज भारत*