वणी शहरात वाहतुकीचे वाजले तिनतेरा सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

163

 

वणी: विशाल ठोबंरे

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शहरात गर्दी होवुनये,मास्क वापरा,सोसिएल डिस्टंसिंगचे पालन करा असे आदेश असुनही शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होतांना पहायला मिळत आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या, टिळक चौकातील एकेरी वाहतूक कित्येक महिन्यापासून बंद असल्याने, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज दुपारी शहरातील मुख्य चौक असलेले आंबेडकर चौक ते टिळक चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी झालेली पहायला मिळाली..
ही वाहतुक कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली असुन ,याकडे वाहतूक विभागाने ,लक्ष देण्याची गरज आहे.
तसेच शहरातील प्रत्तेक चौकात एक वाहतूक पोलीस नेमण्यात यावे. जेणेकरुन अशा प्रकारचा मनस्ताप जनतेला सहन करण्याची गरज पडणार नाही. असे जनते मधुन बोलले जात आहे.