Home चंद्रपूर  बामणी ते आष्टी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या:- बादल उराडे...

बामणी ते आष्टी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या:- बादल उराडे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

170

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- बल्लारपूर बामणी ते आष्टी राष्ट्रीय महामार्गचे होत असलेल्या बांधकामामुळे रस्त्या लगतचे कास्तकार व गावातील नागरीकांची तसेच ज्यांची जमीन रस्त्या मध्ये भुसम्पादन झालेली आहे या सर्वावर होत असलेल्या अन्याय विरुध्द सबंधीत ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांचे वर कारवाई करुन त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष बादल उराडे यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागा मार्फत मौजा बामणी ते आष्टी पर्यंत रस्त्यांचे काम चालु असुन आज घडीला ते बागकाम पूर्ण होण्याचे मार्गावर आहे . सबंधीत विभागाने कास्तकारांच्या जमीनी या मध्ये भुसम्पादन करुन रस्ता तयार करुन वाहतुक चालु करून घेतली आहे.परंतु कास्ताकारांना अजुनही कोणतीही मोबदला मिळालेला नाही.ही कास्तकारांची फसवणुक असून,या बांधकामा मुळे तथा त्यांनी तयार केलेल्या नाल्यामुळे पावसाळयाचे पाणी गावातील लोकांच्या घरात शिरत आहे . त्यामुळे गावकरी लोकांचे खुब नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हंटले असून, रस्त्यांचे उंच बांधकामामुळे कास्तकारोची शेती खोलगट भागात गेली त्या मुळेशेतात शेतकी साहीत्य व जनावरांना नुकसान होत आहे.येणेजाणे करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.गाझे शेता समोर नाला नसतांना सुध्दा खोलगट भाग तयार करण्यात आल्यामुळे माझे शेतात पाणी शिरत असल्याची बाबही उराडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. बांधकामाच्या प्रसंगी मला सुध्दा पक्की नाली तयार करून माझे शेतात पाणी येणार नाही याची मला हमी दिलेली होती ती सुध्दा माझेशी णसवेगीरी झालेली आहे या रस्त्याचे बाधकाम सुरू करतांना कास्तकारांना विश्वासात घेवुन आज त्यांचेशीच विश्वासघात केल्याचे लक्षात येत असल्याने सबंधीत विभागाकडुन कास्तकारांशी व गावकराची फसवणूक झाल्याचे सिद्ध होत असून,या एकूण प्रकाराने जनतेमध्ये रोश निर्माण होवुन कोणतेही अनुचित प्रकार घडण्याची दाड शक्यता असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.

करिता मौजा बामणी ते आष्टी राष्ट्रीय महामार्गचे होत असलेल्या नियोजनशून्य कामामुळे रस्त्या लगतचे कास्तकार व गावातील नागरीकांची तसेच ज्यांची जमीन रस्त्या मध्ये भुसम्पादन झालेली आहे या सर्वावर होत असलेल्या अन्याय विरुध्द सबंधीत ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांचे | वर कारवाई करून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत नामदार विजयभाऊ वडेट्टीवार (मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन , इतर मागास , बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपुर जिल्हयाचे पालकमंत्री) खासदार सुरेश ऊर्फ बाळुभाऊ धानोरकर यांनाही पाठविण्यात आली आहे.

Previous articleना. आदिती तटकरे यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली विविध विषयांवर चर्चा
Next articleवणी शहरात वाहतुकीचे वाजले तिनतेरा सोशल डिस्टंसिंग चा फज्जा