महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु त्यांचा म्रृत्यु नेमका कशाने झाला? यांबाबत शासकीय यंत्रणेकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे!

1251

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी: २७ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथील कांन्क्टैक्टर असोशियन चे पदाधिकारी राजेश उजवणे यांचा शासकीय रुग्णालयात आज निधन झाले असुन त्यांना न्युमोनिया झाला होता त्यांना श्वास घ्यायला त्रास होता. परंतु आज त्यांचा म्रृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला यांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.
त्यांच्या म्रृत्यु च्या कारणाबाबत महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार तसेच गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत यांनी यांबद्दल आम्हाला अद्याप कोणताच रिपोर्ट आला नसल्याचे सांगितले. राजेश उजवणे यांचा म्रृतदेह द्यायला शासकीय रुग्णालयाने नकार देण्याचे नेमके कारण काय? काय त्यांची टेस्ट कोरोना पाँजिटीव तर आली नसेल ना? अशी महादुला कोराडी त चर्चा सुरू आहे.
जर कांन्क्टैक्टर राजेश उजवणे हे पाँजिटीव नसतील तर त्यांच्या इंदिरा प्रगती नगर येथील घरी व त्या परिसरात सोडियम हायपो क्लोरोईड ची फवारणी महादुला नगरपंचायत कडुन का करण्यात येत आहे?

महादुला-कोराडी कांन्क्टैक्टर असोशियन तसेच उजवणे मित्र परिवारात कमालीची भीती व गुप्तता
कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा म्रृत्यु कोरोना ने झाला कि कशाने? यांबद्दल कोणीही खुलेपणाने सांगत नसुन संपूर्ण महादुला कोराडी परिसरात त्यांचा मृत्यू कोरोना नेच झाला अशी चर्चा जोरात सुरु आहे त्यामुळे त्यांची बाँडी त्यांच्या परिवारास देण्यासाठी शासकीय रुग्णालय व नागपुर मनपा प्रशासनाने नकार दिला आहे.
राजेश उजवणे यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या परिवारातील तसेच त्यांच्या मित्र परिवाराने अतितात्काळ आपापली कोव्हीड १९ ची टेस्ट नगरपंचायत महादुला येथे करावी अशी मागणी या परिसरात होत आहे. परंतु उजवणे यांच्या म्रृत्यु ची रिपोर्ट का दाबली जात आहे? हे अद्याप कळले नाही.
त्यामुळे आता महादुला कोराडी येथील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाजेनको कामगारांत भीतीचे वातावरण

कांन्क्टैक्टर उजवणे यांचा म्रृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला आहे? याची महाजेनको प्रशासनाने लिखित माहिती घ्यावी अन्यथा जर कोरोना ने झालीये असल्यास महाजेनको कामगाराच्या आरोग्याला ही धोका उत्पन्न होऊ शकतो असे काही कामगारांनी दखल न्युज भारत ला बोलताना सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील अधिकांश व्यक्ती हे महाजेनको कोराडी नवीन प्रोजेक्ट ला कार्यरत असून त्या सर्वांची कोव्हीड टेस्ट करायला लावावी अशी कामगारांची मागणी आहे अन्यथा आम्ही कामावर येत नाही असा कामगारांना पावित्रा घेतला आहे. मुख्य अभियंता राजेश पाटील अतितात्काळ कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांच्या परिवारातील नातेवाईक कामगारांची कोव्हीड टेस्ट करावी व त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत त्यांना कामावर येण्यापासून बंदी घालावी अशी कामगारांनी मागणी केली आहे.
दुसरीकडे सिविल विभागात, अकाऊंट सेक्शन ऊर्जा भवन या परिसरातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी म्रृतक कांन्क्टैक्टर राजेश उजवणे यांचा यांचा संपर्क बघता सर्वांनी आपापल्या टेस्ट करुन घ्याव्यात जेणेकरून इतरांना संसर्गाची शक्यता होणार नाही.