कोरोनाच्या काळात शिक्षकाने लावली अनेक झाडे असेही दिसून आले शिक्षकांचे निसर्गप्रेम

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोनामुळे गेली चार महिने गावाला असल्याने 100% मी व माझी पत्नी रोहिणी आम्ही शेतीसाठी योगदान देत आहोत.आमच्या पडीक शेतजमिनीत जवळपास 4 एकर क्षेत्रात करवंदीच्या व अनेक काटेरी झाडं-झुडपात कडुनिंबाच्या बिया व सिताफळीच्या जवळपास 500 पेक्षा जास्त बिया जमिनीत टाकल्या आहेत.जेणेकरून हे काटेरी झाडं-झुडपं त्या बिया रुजल्यानंतर त्यांचे संरक्षण कराव्यात या हेतूने टाकल्या आहेत.
या वर्षी पाऊस भरपूर प्रमाणात पडत असल्याने त्या बिया 100% रुजतील… व काही वर्षांत नक्कीच त्या 4 एकर पडीक जमिनीत झाडे होतील व वृक्ष लागवड व संवर्धन या चळवळीला हातभार लागेल.या अपेक्षेनेच आम्ही हा प्रयत्न केला आहे.
झाडे लावण्याला योग्य स्थळें म्हटली म्हणजे पर्वत, डोंगर, टेकड्या,माळ व इतर पडिक जमिनी ही होत; त्याचप्रमाणें नद्या,नाले,ओहोळ,तळीं व कालवे यांच्या काठावर,शेतांच्या सभोंवती,सर्व प्रकारचे रस्ते, सडका यांच्या बाजूने व शहरांतील सर्व रस्त्यांच्या बाजूने झाडे लावण्याचे व त्यांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ व्हायला हवी.
वृक्षांचे महत्व संतांनी फार पुर्वी सांगीतले आहे.संत तुकाराम महाराज म्हणतात ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून ते वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्व सांगतात. वृक्ष तोडीमुळे जमीनीची,मातीची धूप होते,प्रदुषणात वाढ होते, तसेच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.वृक्ष तोडीमुळे जंगल ओस पडु लागली. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे तसेच जमीनीवर पाण्याचे साठे आणि भुगर्भातील पाणी पातळी वाढत नाही. औषधी वनस्पती पण कमी होत आहे . दुष्काळाचे प्रमाण वाढत आहे.या सर्व गोष्टीचा विचार केला तर वृक्षसंवर्धन खुप गरजेचे आहे हे लक्षात येते. यासाठी सर्वांनी मिळुन प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे, त्यांचे संगोपण करणे, वृक्ष तोड थांबवणे गरजेचे आहे . वृक्ष लागवडीच्या फायद्यांचा प्रचार करणे.भूजल पातळीत वाढ करणे.या उपाय योजना करायला हव्यात.
असे प्रयत्न व स्तुत्य उपक्रम आपापल्या परीने जेव्हढे शक्य होईल तिथे राबविले पाहिजे.