Home रत्नागिरी बंधपत्रित परिचारींकांना वेतन न दिल्यास समविचारी लढा उभारणार

बंधपत्रित परिचारींकांना वेतन न दिल्यास समविचारी लढा उभारणार

208

 

प्रतिनिधी :- प्रसाद गांधी.

रत्नागिरी : सहा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्त केलेल्या परिचारीकांना मागिल चार महिने वेतन न मिळाल्याने कोरोना विरोधात लढणा-या या महत्त्वपूर्ण परिचारिकांचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे अन्यथा या परिचारीकांचा अंतर्भाव करुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
याविषयी बोलताना समविचारी प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांनी कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. परिचारीका,वॉर्डबॉय,सफाई कामगारांची कमतरता आहे.जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या परिस्थितीत माणुसकी धर्म आणि कर्तव्ये पार पाडणा-या परिचारीकांना गेले चार महिने विनावेतन राबवून घेतले जात आहे ही शरमेची बाब आहे.
परिचारीका हा आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे.गेले चार महिने विनावेतन त्यांच्या कडून काम करुन घेणे हा प्रशासनाच्या निर्दयीपणाचा पुरावा आहे.
या परिचारीकांना तत्काळ प्रलंबित वेतन न दिल्यास या परिचारीकांच्या समवेत जिल्हा प्रशासनासमोर आंदोलन करण्याचा इशारा समविचारीचे श्रीनिवास दळवी, निलेश आखाडे,जान्हवी कुलकर्णी, राधिका जोगळेकर,आदी पदाधिका-यांनी दिला आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleआज पासून नव्या इमारतीतून नवतळा ग्रामपंचायतीचा कारभार सुरू
Next articleकोरोनाच्या काळात शिक्षकाने लावली अनेक झाडे असेही दिसून आले शिक्षकांचे निसर्गप्रेम