आज पासून नव्या इमारतीतून नवतळा ग्रामपंचायतीचा कारभार सुरू

267

 

प्रतिनिधी/शुभम पारखी
8552850228
7218216140

आज चिमुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवतळा येथील ग्रामपंचायतीचा कारभार नव्या इमारतीतून सुरू झाले आहे इमारतीचे लोकार्पण मा जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ मामीडवार पंचायत समिती सभापती लताताई पिसे पंचायत समिती सदस्य नर्मदा ताई रामटेके
‌. यांच्या हस्ते पार पडले नवतळा ग्रामपंचायतीच्या इमारतीला 30ते 40 वर्ष पूर्ण झाल्याने इमारत जीर्ण झाली होती, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना मागणीनुसार इमारती साठी सन 2018-2019, मध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आली त्यादारे निधी मंजूर करून सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली ,सदर इमारत ही 8 महिन्यांचा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती सोमवारी या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले, यावेळी सरपंच मडावी सर उपसरपंच महादेव कोकोडे ग्रामसेवक तरारे , संगणक अगबर रामटेके ग्रामपंचायत सदस्य रोशन भाऊ मासुरकर, रजनी ताई कुमरे , पोलीस पाटील वंदना ताई जगिटवार, विजय भाऊ डाबरे, बंडु चेडूके, नामदेव ठवरे , सुधाकर खेडकर , लक्ष्मीकांत सुरुकर, व सर्व गावकरी उपस्थित होते