चिमूर नगरपरिषदे अंतर्गत ३ रुग्ण कोरोणा बाधीत,सतर्कता वाढली… — वडाळा पैकू येथील २,”तर,इंदीरा नगर येथील एक.. — अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून आलेले बाधीत..

232

उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर नगरपरिषदेच्या हद्दीतील ३ रुग्ण कोरोणा बाधीत असल्याचा,स्वॅबचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून,२ कोरोणा बाधीत रुग्ण मौजा वडाळा पैकू येथील रहिवासी आहेत तर १ इंदिरा नगर येथील रहिवासी आहे.बाहेरुन आलेले इसम कोरोणा बाधीत असल्याचा स्वॅबचा चाचणी अहवाल येवू लागल्यामुळे प्रशासकीय यंत्रणे बरोबर जनतेत आता सतर्कता वाढू लागली आहे.
अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सदर कोरोणा बाधीताना,चिमूर येथील विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले होते.
संसर्गजन्य कोरोणा,ग्रामीण भागात हळूहळू पोहचू लागल्याने,ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी दक्ष व सतर्क राहावे,एवढे निश्चित…