खल्लार पोलीसांची अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द धडक कारवाई

0
111

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शुक्रवारी सायंकाळीपासून ते सोमवार सकाळपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे या दरम्यान अवैध देशी दारु विक्रेते हे चढ्या भावाने दारु विक्री करीत आहेत
तालुक्यातील खल्लार पो स्टे हद्दीतील चिंचोली शिंगणे या फाट्यावर जनता कर्फ्यु दरम्यान अवैध दारु विक्रीसाठी नेणाऱ्याविरुध्द खल्लार पोलिसांनी धडक कारवाई करुन त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खल्लार पोलीस जनता कर्फ्यु दरम्यान गस्त घालीत असताना त्यांना चिंचोली शिंगणे फाट्यावर रात्रीच्या10:45 सुमारास विकित नारायण जगताप वय 29 वर्ष ,देवानंद दिलीप वानखडे वय 35 वर्ष हे दोघेजण चिंचोली शिंगणे फाट्यावर अंधारात मोटर सायकल वर आडोश्याला लपून बसले असल्याचे आढळले त्यांच्याकडून दखलपात्र गुन्ह्याची शक्यता असल्याने त्यांची झडती घेतली असता चाकू व सलाख आढळून आले
अधिक चौकशी व विचारपूस केली असता उमेश पंजाबराव आठवले वय 29 वर्ष व श्याम हरीचंद्र डिके वय 31 वर्ष हे अवैध देशी दारुचा आणत असल्याचे समोर आले व त्यांनीच या दोघांना पोलीस येण्याची सूचना देण्यासाठी थांबविले होते त्यांच्याकडून पोलिसांनी 9600 रुपयाच्या 160 देशी दारुच्या पावट्या ,दोन मोटर सायकल किंमत 50,000 रुपये जप्त केले असून चारही आरोपीविरुध्द अप न 143/20 कलम 122,135,सहकलम मुदाका 65(इ) नुसार गुन्हा दाखल केला असून हि कारवाई ठाणेदार अभिजित अहिरराव यांच्या मार्गदर्शनात दुय्यय ठाणेदार आशिष गंद्रे, पो कॉ संतोष राठोड, रामेश्वर नागरे, अविनाश ठाकरे यांनी केली