निधन वार्ता माजी नगरसेविका शांताबाई ज्ञानोबा सोनवणे यांचे दुःखद अकस्मिक निधन

 

महादुला-कोराडी : २६ जुलै २०२०
महादुला नगरपंचायत येथील माजी नगरसेविका सौ. शांताबाई ज्ञानोबा सोनवणे (६२ वर्षे) यांचे काल रात्री अकस्मिक निधन झाले आहे.
शिवाजी नगर महादुला निवासी माजी नगरसेविका सौ. शांताबाई ज्ञानोबा सोनवणे यांचा बी पी लो झाल्याने त्यांना नजिकच्या डॉ. सोरमारे यांच्या दवाखान्यात नेले. तिथे त्यांनी शांताबाई सोनवणे यांची तब्येत नाजुक असल्या कारणाने नागपूर मानकापुर येथील अँलेक्सिस हाँस्पिटल ला अँडमिट केले असता तिथे त्यांना रात्रीच डॉक्टरांनी म्रृत घोषित केले.
आज दि. २७ जुलै रोजी दुपारी शांताबाई सोनवणे यांचा अंत्यविधी होईल असे त्यांच्या कुटुंबियाकडुन माहिती मिळाली आहे.