बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभेच्या वतीने बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. अनोख्या पद्धतीने आरक्षण दिवस साजरा.

236

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

किटाळी :- बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा च्या वतीने विधानसभा क्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बहुजन समाज पक्षातर्फे एक छोटीशी भेटवस्तू देत सत्कार करण्यात आले.
नुकताच बारावी वर्गाचा निकाल घोषित करण्यात आला त्यात काही विशेष विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले त्यांचा यथोचित सन्मान म्हणून बहुजन समाज पार्टी तर्फे गावागावात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे घरी भेट देऊन त्यांच्या भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी सर्वात प्रथम आरक्षणाची सुरुवात बहुजन समाजाला कोल्हापूर संस्थानात केली. त्याच्या पार्श्वभूमीवर 26 जुलै 2020 रोजी बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा च्या वतीने आरक्षण दिनाचे औचित्य साधून आरमोरी तालुक्यातील 75 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या किंवा ज्या दुर्गम भागांमध्ये 75% च्यावर गुण प्राप्त नाही झाले अशा गावांमध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा, व तिसरा अशा विद्यार्थ्यांचा पेन व डायरी देऊन त्यांचा सन्मान करणे, तसेच भविष्यातील काही अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावे. आमच्या वतीने आम्ही तेच अडचण दूर करण्याचे प्रयत्न करू. या अनुषंगाने हा दौरा काढण्यात आलेला होता. सर्वप्रथम देऊळगाव या गावी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इंजेवारी, डोंगर सावंगी, किटाळी, चुरमुरा, आकापुर, सूर्य डोंगरी, वडधा, नरोटी चक , सिरसी, गणेशपूर, कोजबी, वैरागड अशा विविध जवळपास 19 विद्यार्थ्यांचे सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कार्य बहुजन समाज पार्टीच्या वतीने आरक्षण दिनाचे औचित्य यानिमित्ताने करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षण दिवस प्रित्यर्थ बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्रा च्या वतीने अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. दि. २६ जुलै २०२० तालुक्यातील देऊळगाव येथे ‘११८ व्या आरक्षण दिवस’ प्रित्यर्थ बसपा तर्फे १२ वी मध्ये यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रभारी सुरेंद्रजी सहारे, जिल्हा कोषाध्यक्ष धनपालजी शेंडे, जिल्हा सचिव राजेशजी लिंगायत, योंगेंद्रजी बन्सोड, प्रशांतजी दोनाडकर, योगेशजी मशाखेत्री, रजतजी रामावत, विधानसभा अध्यक्ष कृपानंदजी सोनटक्के, महासचिव दिनेशजी वालदे, भुजंगराव पात्रीकर, हरेंद्रजी मेश्राम, लिलाधलजी मेश्राम, ईश्वरजी बारसागडे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते. विविध गावातील १९ विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आला व भविष्यात अडचणी आल्यास समस्येचा निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
निखिल तुळशीदास पाथर देऊळगाव, शुभम गुणाजी पात्रीकर इंजेवारी, लखन उमाजी नारनवरे डोंगर सावंगी, सुप्रिया यशवंत शेंडे चुरमुरा, नवीन श्रीरंग सातपुते चुरमुरा, साहिल राजू नागरे आकापुर, गायत्री दिवाकर भोयरा आकापुर, डिंपल कालिदास मेश्राम सूर्य डोंगरी, कोमल शेषराव बर्डे वडधा, उर्मिला कोटांगले देलोडा, शिल्पा देवराव हलामी नरोटी चक, रोशन पुरुषोत्तम भुसारी नरोटी चक, प्रणय दुधराम उंदीरवाडे नरोटी चक, देवकी दलपत कुमोटी, कौशिक रोहन कर, तसेच कोजबी येथील मोहित मधुकर मुल्ले वार , साहिल गिरधर चहांदे, सुरज नेपाल ठाकरे गणेश पुर, देवयानी देविदास दुमाने सिरसी. इत्यादी विद्यार्थ्यांना बहुजन समाज पार्टी तर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी व तसेच उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी covid-19 भान ठेवून शारीरिक अंतर ठेवून व योग्य नियोजनात्मक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे संचालन राजेश जी लिंगायत यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री कृपानंद सोनटक्के यांनी मानले.