पावसा अभावी रोवणी खोळंबली:शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा..

125

 

तालुका प्रतिनिधी- दिपक पाटील
चिमूर-
चिमूर तालुक्यात पावसाअभावी हजारो शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून रोवणी करण्यासाठी एखदा तरी जोराने बरस देवा म्हणून बळीराजा वरून राजाकडे साकडे घालत असल्याचे चित्र आहे..
दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते.बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवित होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते.त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे.
आज पाऊस नाही आला तर उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी येतो.पुन्हा पाऊस आला तर उद्या रोवणी सुरू करायची याचे नियोजन करण्याचे स्वप्न बघू लागतो.हा क्रम मागील दोन-तीन आठवड्यापासून तालुक्यात बघायला मिळत आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर,बोअरवेलने पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांची रोवणी काही प्रमाणात झालेली दिसते,परंतु वरथेंबी पाऊसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस दमदार पाऊसाची वाट बघावी लागणार हे सांगता येत नाही…
हवामान खात्याचा अंदाज फोल
यंदा समाधानकारक पाऊस पडेल किंवा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.परंतु सध्याची स्थिती पाहून अस वाटते की हवामान खात्याचे भाकीत निरर्थक ठरणार असून याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे…