ध्यास अखंड समाजसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हवेली तालुक्यातील जांभली ,आंबी, सोनापुर गावात चष्मे व दैनिक सामनाचे अंक वाटप, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला विधानसभा मतदारसंघ.

0
83

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
ध्यास अखंड समाजसेवेचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हवेली तालुक्यातील जांभली, आंबी, सोनापुर गावात चष्मे व दैनिक सामनाचे अंक वाटप करण्यात आले. याचे आयोजन नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला विधानसभा मतदारसंघ , सुशांत खिरीड समन्वयक पुणे जिल्हा युवासेना शिवसेना, संतोष शेलार शिवसेना हवेली उप तालुका प्रमुख, अभिजीत तावरे शिवसेना विद्यार्थी सेना हवेली तालुका प्रमुख, यांनी केले होते. हवेली तालुक्यात पुन्हा लाॅकडाऊन केलेल्या सोनापुर गावात कोरोनाच्या रूग्णांची वाढ होत असताना देखील शासकीय यंत्रणा तेथे पोहोचली नाही, त्यानिमित्ताने हवेली गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांना नितीन वाघ यांनी फोन करून परिस्थितीचा आढावा दिला आणि लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. चष्मा व दैनिक सामनाचे अंक वाटप करताना उपस्थितीत असलेले जांभली गावचे सरपंच लक्ष्मण तावरे, उपसरपंच निवृत्ती चौधरी, पोलीस पाटील विकास चौधरी, शिवसैनिक बाबाजी तावरे आणि ग्रामस्थांचे आभार देखील मानले गेले.