कोरोना ब्रेकिंग न्युज: कोरोना रुग्णामुळे मारेगाव तालुक्यात दहशत वाढली 38 व्यक्तीचे स्वॅब तपासणी साठी कुंभा येथे सापडला कोरोना रूग्ण बाजारपेठेत शुकशुकाट कुंभा येथील प्रभाग 2 सील

346

 

प्रतिनिधी रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यातील कुंभा येथील कोरोना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या कुंभा येथील 38 व्यक्तीचे स्वॅब तपासणी साठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. यापैकी 24 व्यक्तींना, पुरके आश्रम शाळा मारेगाव येथील कोविड सेंटर मध्ये कोरोन्टाईन करण्यात आले तर 14 व्यक्तीना होम कोरोन्टाईन करण्यात आले.

कसा झाला कोरोनाचा प्रवेश
वणी तालुक्यातील राजुर (कॉलरी) येथील एका 35 वर्षीय महिलेवर हृद्यरोगासंबंधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. डॉक्टरांनी त्या महिलेला शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान कुंभा येथील एक दाम्पत्य या महिलेच्या सेवेसाठी राजुर येथे थांबले होते. दरम्यान रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्या महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात ती महिला पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. संपर्कात आलेल्या 11 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले होते. यातील कुंभा येथील तिघे तर नेत येथील आठ व्यक्तींचा समावेश होता. त्यांना मारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता कुंभा येथील व्यक्तीचा रिपोर्ट पोसिटीव्ह आल्याने ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली.

बाजारपेठेत शुकशुकाट

कुंभा परिसरातील कुंभा हे एकमेव बाजारपेठ आहे.ग्रामीण बाजारांचे फार महत्व आहे कारण परिसरातील जनतेला भाजीपाल्यासह जीवन आवश्यक वस्तूचा आठवडा भर उपयोग केला जातो.परंतु कोरोनाचा कुंभा येथे शिरकाव झाल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.

नागरिकांनी कामा शिवाय बाहेर पडू नये, बोलताना सामाजिक अंतर ठेवून, तोंडाला मास्क, रुमाल वापरावे. कुंभा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींनी मनात कसलीही भीती न बाळगता स्वतःहून कोरोन्टाईन व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे .
दिपक पुंडे (तहसीलदार मारेगाव)