उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव ट्रस्ट ‘ तर्फे दक्षिण मुंबईमधील रुग्णांच्या सेवेकरिता १२ रुग्णवाहिका प्रदान

0
90

बाळू राऊत प्रतिनिधी
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना खासदार – माजी केंद्रीय मंत्री श्री. अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या ‘जाणीव ट्रस्ट ‘ तर्फे दक्षिण मुंबईमधील रुग्णांच्या सेवेकरिता १२ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या असून सदर रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते, सन्माननीय मंत्री – आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला.
याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, उपनेते, मुंबईतील शिवसेनेचे सर्व विभागप्रमुख, महिला आघाडी विभाग संघटक उपस्थित होते.