धक्कादायक बातमी, विषारी औषधाने बाप-लेक अत्यव्यस्त,अज्ञात वेक्तीने पिण्याच्या पाण्यात विष टाकल्याचा संशय,ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु

675

वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील पुरड(नेरड) येथील शेतकरी गजानन पंढरी ढेंगळे(४६) व त्याचे पुञ सौरभ गजानन ढेंगळे (१९) हे बाप लेक आज दि.२६ जुलैला ठेक्याने केलेल्या शेतामध्ये फवारणी करीत असतांना पिण्याचे पाणी एकिकडे ठेवले होते. फवारणी आटपून सौरभ व त्याचे वडील गजानन हे दोघेही बाप लेक पाणी पिण्याकरीता गेले. पाण्याची कँन भरुन असलेले पाणी पहिले मुलगा सौरव ने पिले व त्यानंतर त्याचे वडील गजानन यांनी गिलास भरुन प्यायला लागले,परंतु त्यांना त्या पिण्याच्या पाण्यात विषारी औषधाचा ऊग्र वास आला.त्यांनी त्या कँन मधिल ऊरलेले पाणी हलवुन पाहिले असता एकदम पांढरा फेस बाहेर आला. परिणामी पिण्याच्या पाण्यात विषारी औषध आहे ही त्यांना खाञी होताच त्यानी ताबडतोब दुपारी वणी ग्रामीण रूग्णालय गाठले व रुग्णालयात भर्ती झाले. त्यांच्यावर उपचार सुरू केला असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु या दोघांना मारण्यासाठी कोनी पाण्यात विषारी औषध टाकले असेल? हा गंभीर विषय असुन ते बरे झाल्यावर अज्ञात वक्ती विरूद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करनार असल्याचे गजानन पंढरी ढेंगळे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले आहे.