कामठी आज 26 जुलै कोरोना पाँजिटीव अपडेट; कामठी तहसीलदार यांच्या ड्रायव्हर सह 14 नवे रुग्ण

405

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी /नागपुर : 26 जुलै 2020
नागपुर जिल्ह्यातील कामठी तहसील अंतर्गत आज 14 नवे पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले असुन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे कामठी तहसीलदार यांचा ड्रायव्हर सुद्धा पाँजिटीव आढळला आहे. आज कामठी तालुक्यात कोरोनाबधित आढळलेल्या रुग्णांची संख्या एकूण 14 आहे. तर आज पर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 372 झाली असून 120 रुग्ण हे कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. यानुसार एकूण 252 रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत तर आज नया बाजार चा एक रुग्ण मरण पावला आहे. असून आजपावेतो मृत्यूसंख्या ही 9 झाली आहे.
आज एकूण 14 कोरोणाबधित रुग्णामध्ये इस्माईलपुरा 01, गादा 01,जुनी ओली 01, नया बाजार 01, फुटाना ओली 04, बुनकर कॉलोनी 02, बैल बाजार 01, येरखेडा 01, हरदास नगर 02 च्या रुग्णाचा समावेश आहे.