मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक १३१ तर्फे जन आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते

127

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रं. ८ चे विभागप्रमुख श्री. राजेंद्र राऊत साहेब व विभागसंघटिका डॉ. भारतीताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना घाटकोपर पूर्व विधानसभेच्या वतीने रविवार दिनांक २६ जुलै २०२० रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात सर्दी, ताप व खोकला याची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. विभागातील असंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी उपविभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, संजय दरेकर, उपविभागसंघटिका प्रीति जाधव, शाखाप्रमुख मयुरेश नामदास,नाना ताठेले, अजित गुजर, जितेंद्र परब, शिवसहकार सेनेचे अशोक वंडेकर, माजी शाखाप्रमुख विजय चपटे, शाखा संघटिका मनीषा राऊत, सुनीता माळी कार्यालय प्रमुख दिनकर मांडले, कृष्णा चाळके, धोंडीराम शेवाळे युवासेना विभाग अधिकारी रवी शेनॉय, विशाल चावक, शाखाअधिकारी हेमंत वालझडे, उपशाखाप्रमुख सुरेश गावडे, राजेश खरात, कमलेश राजपुत, नितीन गंभीर, अजित दळवी , बाळासाहेब निकम माजी कार्यालय प्रमुख विजय सहाणे गटप्रमुख ममतेश पवार, कमलेश तावडे युवासेनेचे अजित घगवे व इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.