रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 37 नवे रुग्ण  एकूण  पॉझिटिव्ह  1557 एकूण बरे झाले 987, तर 3 मृत्यू

0
194

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1557 झाली आहे.  दरम्यान 03 रुग्णांचा मृत्यू झाला असून सदरचे 02 रुग्ण रत्नागिरी व 1 रुग्ण राजापूर येथील आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 52 झाली आहे.
आज 34 रुग्णांना   बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.  यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 987 झाली आहे.  आज बरे झालेल्यांमध्ये  जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी 8, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 7,  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 11, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड येथील 8 रुग्ण आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी – 04 रुग्ण
दापोली-11 रुग्ण
कामथे-20 रुग्ण
गुहागर-02 रुग्ण

*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 1557
बरे झालेले  – 987
मृत्यू  – 52
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 518

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन*
जिल्ह्यात सध्या 148 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये,  दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
*संस्थात्मक विलगीकरण*
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  59, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  1,  उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 18,  कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -3, केकेव्ही, दापोली  15, कोव्हीड केअर सेंटर घरडा 1, कोव्हीड केअर सेंटर लांजा 1असे एकूण 100 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
*होम क्वॉरंटाईन*
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या  20 हजार 428  इतकी आहे.

13 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 16 हजार 82  नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 15 हजार 558 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1557 अहवाल पॉजिटीव्ह आले असून  13 हजार 990 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 524 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   524 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे.  ही माहिती      दि. 26 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.  यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो.  पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची  माहिती देण्यात येईल.

*दखल न्यूज भारत*