पुणे शहरात पाऊस पडतोय पण ग्रामीणची दुबार पेरणीची चिंता वाढली, सागर शिर्के

0
143

अतुल पवळे पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
कोरोनाचा कहर त्यासोबतच पावसाचे गायब होणे ह्या चिंतेने मात्र आता पुणे जिल्ह्यातील शेतकरी हैरान झाला आहे. ज्या भागात दुष्काळ असायचा तेथे आज पुर आलेत,आणि जी धरणे सगळ्यात आधी भरायची ती मात्र कोरडी पडायच्या स्थितीत आहे. ज्या चार धरणावर पुणे शहरासोबत बारामती, इंदापूर, दौंड अशी अनेक ठिकाण अवलंबून असतात त्या चारही धरण परिसरात पाऊस नसल्याने पातळी खुप खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेती देखील अडचणीत आली आहे. पुणे शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी भातलावणी केली व काहीची पावसामुळे थांबली आहे याचे मुख्य कारण पाणीच नसेल तर लावून देखील उपयोग नाही. हीच परिस्थिती आहे अहिरेगाव, खाडेवाडी,वांजळेवाडी, मोकरवाडी, सोनारवाडी येथील शेतकऱ्यांची आतापर्यंत पंचवीस टक्के भातलावणी झाली आहे व काहींची राहीली आहे, यामुळे शेतकरी मात्र चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सागर शिर्के यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.