घाटकोपर पंतनगर पोलीस स्टेशन याठिकाणी अँटीजेन रॅपीड टेस्ट शिबीर

0
90

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्या कारणाने मुंबईत पोलीस बांधव रस्त्यावर तसेच विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे लोकांच्या संपर्कात येऊन त्यांना कोरोना होण्याचा जास्त धोका असल्याने नगरसेविका राखी जाधव यांनी प्रभाग क्रमांक १३१ मध्ये पंतनगर पोलीस स्टेशन याठिकाणी अँटीजेन रॅपीड टेस्ट शिबीर भरवण्यात आले होते. पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे शिबीर भरवण्यात आले होते.पंतनगर पोलीस स्टेशन येथे आयोजित शिबीराला चांगला प्रतिसाद लाभला. ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती त्यांची तातडीने अँटीजेन टेस्ट करण्यात आली. मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. त्यानतंर त्यांना पुढील औषधोपचारासाठी डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात आला