चेंबरमध्ये पोलीस, पालिका कर्मचारी व पत्रकार व वृत्तपत्र वितरण, वितरकाचा आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद.

128

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ड्युटीवर असलेल्या सर्व पोलीस,पालिका कर्मचारी आणि पत्रकारांची आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली ही आरोग्य तपासणी निब्बाण शैक्षणिक आणि सामाजिक ट्रस्ट ( नेस्ट ) व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ.योगेश भालेराव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस, पालिका कर्मचारी व पत्रकार व वृत्तपत्र वितरण व वितरक यांच्या करिता आरोग्य शिबीर आज चेंबूर येथील रघुनाथ शिसोदे पालीका सभागृहात घेण्यात आले होते यावेळी झेब्रा फाऊंडेशन अध्यक्ष आशिष गडकरी व भाजप नेते अनिल ठाकूर तसेच वार्ड क्रमांक 119 च्या नगरसेविका मनीषा रहाटे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले त्याचप्रमाणे यावेळी दोनशे पेक्षा अधिक पोलीस, पालिका कर्मचारी, पत्रकार, विविध वृत्तपत्र कंपनीचे वितरण अधिकारी, वितरक यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.